एकनाथ बेदरे , संस्कृती मुळे बनले मंगळवेढा केसरी
मंगळवेढा/विक्रांत पंडित
३७ व्या वर्षापासून दरवर्षी २६ जानेवारी मारुतीच्या पटांगणात अध्यक्ष मारुती वाकडे यांच्या पुढाकारातून या स्पर्धा घेतल्या मंगळवेढा जातात, या स्पर्धेत ३० किलो वजन गटापासून खुल्या वजन गटापर्यंत २४० मल्ल सहभागी झाले होते.
यामध्ये महिला कुस्तीपटू ४० मल्ल तर २०० पुरुष मल्ल सहभागी झाले. अंतिम फेरीत पुरुष केसरी बहुमान पटकावण्यासाठी एकनाथ बेदरे व परमेश्वर गाडे यांच्यात लढत झाली. त्यामध्ये २-५ पॉइंट वर एकनाथ बेदरे यांनी बाजी मारली तर महिला केसरी स्पर्धेत अंतिम विजेतेपदासाठी संस्कृती मुळे हिने पल्लवी बागडे हिला चितपट केले.
मोना रत्नपारखी, डॉ.आसावरी घोडके, डॉ. रेहाना मुलाणी, नीलाताई आटकळे, डॉ. प्रीती शिर्के, अरुणा माळी, प्रज्ञा मासाळ, मनीषा जाधव, शीतल वाकडे, दया वाकडे, सविता वाकडे यांच्या हस्ते बक्षीस दिले
महिला मंगळवेढा केसरी विजेत्या स्पर्धकास धनश्री परिवाराच्या वतीने वीस हजार रुपयाचे पारितोषिक व अरुण गुंगे यांच्या वतीने चांदीची गदा देण्यात आली तर पुरुष मंगळवेढा केसरी विजेत्या एकनाथ बेदरे यांना वैभव नागणे यांच्या हस्ते पंधरा हजार व चांदीची गदा देण्यात आली.
यावेळी पुंडलिक साळे, सचिन डोरले, बाळासाहेब निकम, अनिल इंगळे, उदयसिंह इंगळे सोमनाथ अवताडे, अप्पासाहेब पाटील, हनुमंत मासाळ, मुरलीधर दत्तू उपस्थित होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, भगीरथ भालके, महेंद्र देवकते, सत्यवान घोडके, रणजित माने, अप्पा चोपडे, अॅड सुजित कदम, शिवानंद पाटील, राजाराम सूर्यवंशी, दिलीप जाधव, प्रदीप पवार, औदुंबर वढदेकर, भारत बेदरे उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments