Type Here to Get Search Results !

संतसूर्य

मंगळवेढा सह जिल्हात सर्वसामान्यांचे अर्थकारण सोडवण्यासाठी प्रा शिवाजीराव काळुंगे यांनी मोठी चळवळ उभा केली = शरद पवार 
  

मंगळवेढा/ विक्रांत पंडित 

 शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाणी प्रश्नासाठी व सर्वसामान्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक गरज भागवण्यासाठी प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी‌ मोठी चळवळ उभी केली असल्याचे प्रतिपादन माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी केले आहे.
धनश्री व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे व प्रा.शोभाताई काळुंगे यांच्या अमृत महोत्सव सत्कार व अमृतमहोत्सवी अर्थवेल या ग्रंथाचे प्रकाशन सोहळ्या प्रसंगी शरद पवार बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे होते.
व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह. साळुंखे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, प्रा. शोभाताई काळुंगे, विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,  माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार रामहरी रूपनर, हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवाडी, चेतन नरुटे, माजी आमदार धनाजी साठे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते,  श्री. श्री. सद्गुरु साखर कारखान्याचे चेअरमन शेषराव, जकाराया शुगरचे चेअरमन बिराप्पा जाधव, बाळासाहेब शेळके, प्रकाश पाटील, भगीरथ भालके,राहुल शहा, सुरेश हसापुरे, गणेश पाटील, दिनकर पाटील, नागेश फाटे, ॲड. सुजित कदम, ॲड. दिपाली पाटील, स्नेहल मुदगल,  सुयोग गायकवाड यांचेसह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की,  या परिसराला दुष्काळाची झळा कायम असताना देखील अतिशय खडतर परिस्थितीत शेती, पाणी, शिक्षण, सहकार आणि समाज उभारण्यासाठी काळुंगे पती-पत्नीने आपले आयुष्य झोकून देण्याची भूमिका पार पाडली.
त्यातून अनेक संस्थाची उभारणी देखील केली असून माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रत्येक निवडणुकीची जबाबदारी देखील त्यांनी चोखपणे पार पाडली. शिवाजीराव काळुंगे यांनी प्रेम विवाह केल्याची चिंता सुशीलकुमार शिंदे यांना का? असा सवाल उपस्थित केल्यानंतर उपस्थित जोरदार हसा उमटला.
आपल्या मातीशी नाळ असणारी माणसं या दुष्काळी भागात जन्माला आली, दु्ष्काळी भागातील शेतकरी सन्मानाने जगण्यासाठी प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी मोठया जिद्दीने सर्वसामान्य जनतेसाठी सर्व काही उभे केले आहे.
अनेक लेखक देखील दु्ष्काळी भागात वाढले, साहित्याच्या क्षेत्रात चांगल काम केलं, अनेक नेते देखील याच मातीत जन्माला आले, या भागातच प्रा.शिवाजीराव काळुंगे जन्माला आले. इतिहासाला दृष्टी देणारा हा भाग आहे, असे शरद पवार म्हणाले.
माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, हाडाच्या शिक्षकी पेशातून काळुंगे परिवारांने एवढा मोठा आर्थिक संस्थेचा डोलारा उभा करताना नवा समाज घडविण्याचे काम केले. आर्थिक संस्था चांगल्या चालवून दाखवल्या. 
डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी तसेच त्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी स्व. नागनाथआण्णा नायकवडी व स्व. डॉ. भाई गणपतराव देशमुख पाणी परिषदेची चळवळ प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. पाणी चळवळ आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान राहिले आहे. असे सांगत अमृत महोत्सव निमित्त आपल्या मनोगत शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी हर्षवर्धन पाटील, जयवंत महाराज बोधले, अभिजीत पाटील, प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी शरदचंद्रजी पवार व सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते स्नेहल मुदगल व अभिजीत मुदगल यांच्या जिरेनियम  शेती बाय प्रॉडक्ट असणाऱ्या रूम फ्रेशनर या प्रोडक्ट उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी मंगळवेढा पंढरपूर सांगोला मोहोळ या भागातून धनश्री परिवाराचे हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिताराम महाराज कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी गायकवाड-काळुंगे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंद्रजित घुले व श्वेता हुल्ले यांनी केले. तर आभार गौरव समितीचे प्रमुख शिवानंद पाटील यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत, धनश्री मल्टीस्टेट सरव्यवस्थापक रमेश फडतरे व सद्गुरू सिताराम साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर हनुमंत पाटील यांचे सह धनश्री व सिताराम परिवारातील कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments